आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजनगरमध्ये टवाळखोरांचा त्रास:अल्पवयीन मुलाला तिघांची मारहाण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगर भागातील महाराणा प्रताप चौकात एका अल्पवयीन मुलाला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. क्लासेस सुटल्यानंतर १७ वर्षीय मुलगा घरी जाताना किरकोळ कारणावरून त्याला रस्त्यात अडवून तिघांनी शिवीगाळ व मारहाण केली. आदित्य बाविस्कर याने लोखंडी पाइप व सिमेंटचा गट्टू मुलाच्या डोक्यात मारला. याप्रकरणी १७ वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून ऋषभ बाविस्कर (१८), आदित्य बाविस्कर (१९), विशाल झगडे (२०, तिघेही रा. त्रिमूर्ती चौक, बजाजनगर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या भागात कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा त्रास होत असल्याची लेखी तक्रार येथील अर्जुन आदमाने, आशा खोबरे, प्रियंका देशमुख व इतरही नागरिकांनी पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे ३ फेब्रुवारी रोजी केली.चार-पाच दिवसांत एकदा तरी आमच्या सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर क्लासेसच्या मुलांची भांडणे होतात, असे नागरिकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...