आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माता न तू वैरिणी:हडकुळा नवरा सोडून दुसरे लग्न करण्यासाठी मातेने पोटच्या मुलाला विषप्रयोगाने मारले, तब्बल एका वर्षानंतर हिमायतनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा

नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेला दुसरे लग्न करण्यासाठी मुलगा ठरत होता अडसर

पहिला नवरा पसंत नसल्याने दुसरा घरोबा करण्यासाठी अडचण ठरणाऱ्या पोटच्या मुलाला मारून टाकणाऱ्या मातेसह तिच्या परिवारातील ५ जणांविरुद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल एका वर्षानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कांताबाई तवर असे या वैरी मातेचे नाव आहे.

२३ जुलै २०१९ दरम्यान मौजे खडकी बाजार ता. हिमायतनगर येथे नमन ऊर्फ शिवप्रसाद (वय ०३ वर्षे) रा. बोरगाव या बालकावर विषप्रयोग करून खून केल्याचा आरोप मृत मुलाचे आजोबा तथा फिर्यादी अशोक भोजराज तवर रा. बोरगाव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून केला. परंतु त्यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यासच नकार दिला. त्यामुळे फिर्यादीला न्यायालयाचा आधार घ्यावा लागला. तक्रारीनुसार फिर्यादी अशोक तवर यांचा मुलगा संदीप उर्फ संजय तवर हा शेतकरी असून, तो हडकुळा असल्याने त्याची बायको कांताबाई हिला आवडत नव्हता. त्या दोघांना २८ मार्च २०१६ मध्ये एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव नमन ऊर्फ शिवप्रसाद होते. त्यानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने कांताबाई आपल्या माहेरी राहत होती.

कांताबाईने दिवाणी न्यायालय हिमायतनगर येथे पोटगी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला. त्यानंतर अशोक तवर यांनी मुलगा नमन ऊर्फ शिवप्रसाद याचा ताबा देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु तो लहान असल्याने त्यांना मुलाचा ताबा मिळाला नाही.

फिर्याद घेण्यास नकार

यासंदर्भात अशोक तवर रा. बोरगाव ता. हिमायतनगर यांनी प्रथम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. परंतु पोलिसांनी तक्रारीची दाखल घेतली नाही . तवर यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये हिमायतनगर पोलिस ठाण्यात २८ सप्टेंबरला रात्री भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि बालाजी महाजन करीत आहेत.

मुलगा ठरत होता लग्नात अडसर

कांताबाईला तिच्या मनासारखा दुसरा नवरा करायचा होता. परंतु मुलगा नमन हा लग्नात अडचण ठरत असल्याचा तिचा समज होता. त्यामुळे कांताबाई संजय तवर (वय २८ वर्षे रा. खडकी) ता. हिमायतनगर (आई), आजी सुनंदाबाई दत्तराव सूर्यवंशी (वय ५० ), आजोबा दत्तराव देवराव सूर्यवंशी (वय ५५), पणजोबा देवराव सूर्यभान सूर्यवंशी (वय ७०) व ममता दत्तराव सूर्यवंशी (वय २१ वर्ष) यांनी संगनमताने २३ जुलै २०१९ रोजी नमन यास मारण्याच्या उद्देशाने त्यास विष पाजले. त्यानंतर लगेच त्यास संडास उलट्या झाल्याने प्रथम हिमायतनगर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने लगेच नांदेड येथे उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान२६ जुलै २०१९ रोजी नमन ऊर्फ शिवप्रसाद मरण पावला.

बातम्या आणखी आहेत...