आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार सोहळा:मुलांवर विश्वास ठेवून त्यांची स्वप्ने साकारणे हेच आईचे स्वप्न

औरंगाबाद / गिरीश काळेकर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांवर चांगल्या संस्कार करताना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रासाठी सतत पाठिंबा देत राहावे, असा सल्ला प्रेमस्वरूप आई आणि मातृगौरव पुरस्कार मिळवणाऱ्या आईंनी तमाम मातांना दिला. स्वरलहरी, कलारंगतर्फे शनिवारी वरद गणेश मंदिराच्या सभागृहात पुरस्कार सोहळा झाला. त्यात दिव्य मराठीशी बोलताना अभिनेते संदीप पाठक यांच्या आई प्रा. स्नेहल पाठक, कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांच्या आई स्मिता कऱ्हाडे, तबलावादक शरद दांडगे यांच्या आई इंदिराबाई दांडगे यांनी मातृप्रेमाचे सूत्र सांगितले.

मनावर दगड ठेवत शरदला काशीला तबल्याच्या शिक्षणासाठी पाठवले : दांडगे शरद दांडगे यांच्या आई इंदिराबाई दांडगे म्हणाल्या, शरद आजोबा अन् अनंत माळींकडून तबला शिकला. पुढच्या शिक्षणासाठी काशीला जायचे होते. परंतु पाच मुली आणि एकुलता एक मुलाला कसे पाठवावे याची चिंता होती. शेवटी त्याची जिद्द, आवड पाहून मनावर दगड ठेवून पाठवण्याचा निर्णय घेतला. काशीला एका महाराजांनी त्याला दत्तक म्हणून ठेवायचे ठरवले होते. हे एेकून त्याची मला व आजीला खूपच काळजी वाटली. आजी रडत होती. शेवटी काशीला जाऊन दत्तक वगैरे काही ठेवायचे नाही असे सांगितले. ७ वर्षांनी शरद परत आला. त्याने जी स्वप्ने ठेवली ती साकार झाली.

सातव्या वर्षी मेडल, झी अवाॅर्ड मिळाले तो क्षण अविस्मरणीय : कऱ्हाडे कलावंत संकर्षण कऱ्हाडे यांच्या आई स्मिता कराडे म्हणाल्या, संकर्षणला वयाच्या सातव्या वर्षी नाटकात मेडल मिळाले. त्याला बालकलाकार म्हणून कालिदास कुलकर्णी यांनी नटराजाची मूर्ती दिली अन् नटराजाचे भवितव्य तुझ्या हाती असल्याचे म्हणाले. अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअरिंग क्षेत्रात जायची. मात्र मी त्याच्यावर बंधने लादली नाहीत. फक्त चेष्टेचा विषय होऊ नये असे त्याला सांगायचे. जेव्हा झी मराठीचा अवाॅर्ड मिळाला तो आनंदाचा क्षण होता. तो क्षण पाहून ऊर भरून येतो. आईने संस्कार घडवले पाहिजेत, मुलांवर अपेक्षांचे ओझे न ठेवता योग्य संस्कार देणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...