आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:गॅस सिलिंडर नेणाऱ्या पिकअप व बसची समोरासमोर धडक; एक ठार, 30 जखमी

सिल्लोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याच्या वळणावर भरधाव एसटी बस आणि सिलिंडर वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन चालक जागीच ठार, तर बसमधील ३० प्रवासी जखमी झाले. पिकअप चालक सुरेश सांडू गुंजाळ (४५ रा. पिंपळगाव पेठ, ह. मु. आव्हाना, ता. भोकरदन) असे मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवार दुपारी ५ वाजेच्या सुमारास सिल्लोड-भराडी रस्त्यावरील वांगी फाट्यानजीक घडला. सिल्लाेड आगाराची सिल्लाेड-पाचाेरा मुक्कामी बस पाचोऱ्याकडे जात असताना हा अपघात झाला.

दाेन्ही वाहनांचा चुराडा : हा अपघात इतका भीषण होता की, बसची एक बाजू नष्ट, तर पिकअपचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर पिकअप रस्त्यावर उलटल्याने गाडीतील गॅस सिलिंडर रस्त्यावर विखुरले गेले. अपघात होताच बसमधील प्रवासी घाबरले होते.

बातम्या आणखी आहेत...