आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट सर्किटचा अंदाज:सूतगिरणी चौकात उभ्या खासगी बसला आग, दुसरी पेटण्यापूर्वी आग नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूतगिरणी चौकातील देशी दारूच्या दुकानासमोर बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. पाहता पाहता बसला आगीने वेढले व काही मिनिटांमध्ये बस जळून खाक झाली. त्यामुळे समोर उभ्या दुसऱ्या बसचा मागील भाग यात जळाला. घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागासह पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, राजश्री आडे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. एका बाजूची वाहतूक बंद करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दोन्ही बस खासगी कंपनीच्या आहेत. चालक नेहमी चौकात बस उभी करून जातात, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.