आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:सिल्लोडमध्ये उभारणार खासगी मेडिकल कॉलेज ; आधी 20 एकरांत साकारणार 300 बेडचे रुग्णालय

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत घाटी हे शासकीय व एमजीएम विद्यापीठाचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. आता जिल्ह्यात आणखी एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडणार आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिल्लोडमध्ये हे कॉलेज सुरू करणार आहेत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ३०० बेडचे खासगी रुग्णालय लवकरच सुरू केले जाईल.

सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर सत्तार यांच्या संस्थेच्या वतीने भव्य रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील रुग्णांनाही येथील आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. २० एकरांत हे हॉस्पिटल करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आमची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

तीन-चार वर्षे लागतील
कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आमचे नियोजन आहे. त्याची पहिली पायरी म्हणून ३०० बेडचे हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात रुग्णालयाची उभारणी व त्यानंतर मेडिकल कॉलेजला परवानगी यासाठी आणखी तीन-चार वर्षे लागतील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...