आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशूलिभंजन पर्वतावरील दत्त मंदिरात दोन दिवसी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता बुधवारी, सकाळी ७.३० वाजता दौलताबादहूून दिंडी निघेल. यामध्ये ७०० जणांचा सहभाग असेल. दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान जन्मोत्सवाचे कीर्तन होईल, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
१९९८ मध्ये निर्माण झालेले शूलिभंजन पर्वतावरील दत्तमंदिर दीड हजार स्वेअर फुटांचे आहे. त्या वेळी तामिळनाडूतील कारागिरांनी मंदिर निर्माण केले आहे. उत्सवादरम्यान ८ डिसेंबरला सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान उद्धव आनंदे यांचे काल्याचे कीर्तन होईल. यानंतर या वेळी दीड हजार भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मंदिराची सुरक्षा भिंत उभारण्यासाठी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी १ कोटीचा निधी दिला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.
शहरातील १६ मंदिरांतही साजरा होणार जन्मोत्सव शहरात हर्सूल, एन-६, एन-७, बंजारा कॉलनी, पद्मपुरा, वाळूज, उल्कानगरी, जाधववाडी, समर्थनगर, नागेश्वरवाडी, गुलमंडी, टिळकनगर, विद्यानगर, संग्रामनगरसह विविध भागात १६ दत्तमंदिरे आहेत. या ठिकाणी सायंकाळी दत्तजन्मोत्सव होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.