आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजन्मोत्सव:पिसादेवी येथे 15 फेब्रुवारीपासून नाटक, व्याख्यान, पोवाड्याचा रंगणार कार्यक्रम

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पिसादेवी येथे शिवजन्मोत्सव समितीतर्फे १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान पाचदिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. पिसादेवी येथील शिवबानगरीत सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत व्याख्यान, नाटक, पोवाडा, शिवगाथा, जागरण-गोंधळ यासह विविध कार्यक्रमांची पर्वणी शहरवासीयांना मिळणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पिसादेवी येथे गावकरी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजन होईल. नेपथ्य आणि महाराजांचे देखणे व्यक्तिमत्त्व यातून अनुभवता येणार असल्याने सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...