आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाचे निदर्शने:आग्रा किल्ल्यात शिवजयंती नाकारणाऱ्या पुरातत्व प्रशासन अन् भाजपविरोधात आंदोलनाचा दिला इशारा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आग्रा किल्ल्यात साजरी करण्याची परवानगी पुरातत्व विभागाने नाकारली आहे. याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी क्रांती चौकात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पुरातत्व प्रशासन आणि सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने दिली.

औरंगाबादेतील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा किल्ल्यात साजरी करण्याची परवानगी द्यावी, यासाठी संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील यांनी ११ नोव्हेंबर २०२२ पासून पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. आता त्यांनी परवानगीच नाकारली. विशेष म्हणज्ये याच आग्रा किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढेच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. या परवानगी का नाकारल्या नाहीत? ज्यांचा ऐतिहासीक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासीक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली असा संतप्त सवाल अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. न्यायालय ते दात मागितले आहे यावर न्यायालयाने पुरातत्त्व विभागालाचा विचारला आहे.

तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज क्रांती चौकात आता शिव ध्वज घेऊन भाजप सरकारचा व पुरातत्व विभागाच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला व निदर्शने दिली. आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊ दिली नाही तर देशभर तीव्र आंदोलन छेडल्या जाईल तसेच आगामी निवडणुकीत याचे परिणाम सत्यदारांना भोगावे लागतील असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे.

सुनील कोटकर, रमेश गायकवाड, आप्पासाहेब कुढेकर पाटील, सुरेश वाकडे पाटील, रेखा वाहटुळे आदी शिवप्रेमींनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...