आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक जुनी म्हण आहे की, आयुष्यात आपण कोणत्याही व्यक्तीला विनाकारण भेटत नाही. माझा यावर खूप विश्वास आहे. त्याचा हा पुरावा.मिंडी स्यू ग्लेझर आणि ऑर्थर बूथ दोघेही फ्लोरिडाच्या मियामी बीचजवळील नॉटिलस मिडल स्कूलमध्ये शिकले. दोघे एकत्र सॉकर खेळले, पण ऑर्थर गणित व विज्ञानात किती हुशार आहे हे पाहून मिंडी आश्चर्यचकित होत असे. ऑर्थरला न्यूरोसर्जन व्हायचे होते आणि तो अभ्यासात हुशार होता. इतर मुलांप्रमाणे दोघेही हायस्कूलनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी वेगळे झाले. मिंडीने १९८८ मध्ये मियामी विद्यापीठातून बीए केले आणि १९९१ मध्ये सेंट थॉमस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. प्रथम स्वत: सराव केला, नंतर ५ सप्टेंबर २००० रोजी फ्लोरिडाच्या अकराव्या सर्किट न्यायालयात न्यायाधीश झाली. ग्लेझर २०२५ पर्यंत या पदावर राहील. दुसरीकडे ऑर्थरला वयाच्या १७ व्या वर्षी जुगार खेळण्याचे व्यसन लागले. परिणाम - कर्ज, नैराश्य आणि अमली पदार्थांचे व्यसन. २०१५ मध्ये ऑर्थर न्यायाधीश ग्लेझरच्या न्यायालयात आला तेव्हा त्याने आधीच घरफोडीसाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती. पण, या वेळी कोर्टात त्याचा सामना एका जुन्या वर्गमैत्रिशी झाला, तिने त्याचे आयुष्य बदलून टाकले.
न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला विचारले की, तो फ्लोरिडातील नॉटिलस मिडल स्कूलमध्ये शिकला आहे का? आरोपीने हो म्हणताच न्यायाधीश ग्लेझरला समजले की, तो ऑर्थर आहे. त्या म्हणाल्या, ‘हा मिडल स्कूलचा सर्वात हुशार विद्यार्थी होता. मी त्याची मोठा चाहती होते. त्याची ही अवस्था कशी झाली ते मला समजले नाही.’ न्यायाधीश ऑर्थरचे कौतुक करत होत्या व तिकडे ऑर्थरच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. लाज वाटल्याने तो न्यायाधीश ग्लेझर यांच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. ग्लेझर म्हणाल्या की, ऑर्थरला स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यास शिकण्याची गरज आहे. ग्लेझर यांनी ऑर्थरला ४३,००० डाॅलर दंड किंवा १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, “म्हणाल्या, तू आपले आयुष्य बदलू शकशील. तुला येथे पाहून वाईट वाटले. माझ्याकडे तुझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आता तू तुझे जीवन कसे बदलतोस, हे तुझ्या हातात आहे.’ ऑर्थर दंड भरू शकला नाही, म्हणून तुरुंगात जावे लागले. न्यायाधीशांच्या प्रेरणादायी शब्दांनी ऑर्थरला पूर्णपणे बदलून टाकले. त्याने तुरुंगात पुस्तके वाचण्यात व व्यापाराच्या युक्त्या शिकण्यात वेळ घालवला. चांगल्या वागणुकीसाठी त्याला १० महिन्यांनी सोडले. आर्थर म्हणतो, ‘त्या (ग्लेझर) माझे प्रेरणास्थान आहेत. त्या अतुलनीय आहेत. आता काय करायचे ते मला माहित आहे. मी हार मानणार नाही. मला नवीन जीवन मिळाले.’
ऑर्थरने स्वतःला व न्यायाधीश ग्लेझर यांना वचन दिले, तो परत तुरुंगात येणार नाही. ऑर्थरसाठी पुन्हा सुरुवात करणे सोपे नव्हते. त्याने व्यसनावर उपचार घेतले व जुगारापासून दूर राहिला. सध्या तो एका फार्मास्युटिकल कंपनीत मॅनेजर आहे. तो प्रवास करतो व स्वतःच्या घरात राहतो. तो अजूनही न्यायाधीश ग्लेझर यांच्या संपर्कात आहे. या कथेतून अनेक धडे शिकता येतात, उदा. विनाकारण आपल्याला काही मिळत नाही, आपले जीवन कधीही बदलू शकते व आपण जो मार्ग निवडतो, तसेच होतो. परंतु…
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.