आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य रब्बी पीक (गहू सर्वसाधारण गट) स्पर्धा २०२१ चे निकाल २७ मार्च रोजी जाहीर झाले आहेत. त्यामध्ये खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावचे शेतकरी राजू हारदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका हेक्टरमध्ये ७८ क्विंटल १ किलो गहू पिकवण्याचा त्यांनी विक्रम केला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी गावचे सोमनाथ पेखळे यांनी ७६ क्विंटल ३० किलो आणि तिसऱ्या क्रमांकावर वासाळी गावचे श्रीराम मते यांनी ७५ क्विंटल ३३ किलो गहू पिकवला आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, गव्हाचे उत्पादन वाढवणे व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काय झाली याच्या नोंदी घेणे, यासह अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने रब्बी गहू पीक स्पर्धेचे आयोजन केले जाते. सर्व जिल्ह्यांतून शेकडो शेतकरी यामध्ये सहभागी होतात. ग्रामस्तर ते राज्य पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाच्या नोंदी घेतल्या जातात. त्याची सत्यता तपासण्यासाठी स्थानिक ते वरिष्ठ पातळीवर परत परत पडताळणी होते. त्यानंतर निकाल जाहीर केले जातात. २०२१ रब्बी पीक स्पर्धेचा निकाल कालच जाहीर झाला असून त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबारेगावचे राजू हारदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सूक्ष्म पडताळणी केली जाते रब्बी पीक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनाची सूक्ष्म पडताळणी केली जाते. त्यानंतरच निकाल जाहीर केले जातात. राज्यात आपल्या जिल्ह्यातील शेतकरी हारदे यांनी ७८.१ क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे. इतर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रयोगाचा उपयोग करून घेता येईल. तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेचे निकाल लवकरच लागतील. त्यानंतर जिल्हा व तालुकास्तराचे निकाल जाहीर होतील. दिनकर जाधव, कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग.
असा पिकवला गहू
अर्धा एकराला पाच ट्राॅली शेणखत टाकले .चार पाणी पाळ्या दिल्या. डीएपी व युरिया खताचा डोस दिला. तणनाशक मारले होते. बुरशीनाशक फवारणी केली होती. पहिला क्रमांक आला याचा आनंदच आहे, पण शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. - राजू हारदे, गहू उत्पादक, गल्लेबोरगाव.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.