आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहोचला 23 वर:जिन्सीत एका बालकाचा गोवर अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवरच्या संशयित बालकांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न सुुरू आहे. रविवारी आणखी एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ झाली आहे.चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव, मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर, जवाहर कॉलनी, विटखेडा, गांधीनगर, मसनतपूर, सिडको एन-११, एन-८, हर्सूल, शहाबाजार, हर्षनगर यासह शहरातील विविध भागांत आतापर्यंत गोवरचे संशयित रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे सर्वच भागांत गोवरचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, १ डिसेंबरपासून आतापर्यंत गोवरचे शहरात २३७ संशयित रुग्ण आढळले. शनिवारपर्यंत २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणखी एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तो बालक जिन्सी भागातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...