आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक क्रिकेट स्पर्धा:अल आरजी वॉरियर्सचा शानदार विजय; बाबा बिल्डर्सला हरवले

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सव अंतर्गत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत अल आरजी वॉरियर्सने शनिवारी विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या सामन्यात वॉरियर्सने बाबा बिल्डर्स संघाला 5 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात इम्रान खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून वॉरियर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बाबा संघाने 15 षटकांत 3 बाद 119 धावा काढल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फारुख कुरेशी 6 धावांवर परतला. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार सलमान अहमदने 40 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. तो संघासाठी एकाकी लढला. कय्युम भोपळाही फोडू शकला नाही. अष्टपैलू रिजवान कुरेशीने 13 चेंड 2 चौकारांसह 13 धावा केल्या. युवा फलंदाज विनायक भोईरने 28 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा करत संघाला शंभरी गाठून दिली. वॉरियर्सकडून सईद अरीफ, वहाब, वसिम शेखने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

इम्रान, अमन चमकले

प्रत्युत्तरात अल आरजी वॉरियर्सने 12.5 षटकांत 5 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. डावाच्या पहिल्याच चेंडूंत आसिफ खान आणि त्यानंतर आलेला वसिम शेख दोघेही शुन्यावर बाद झाले. कर्णधार इम्रान पटेलने डाव सावरला. त्याने 11 चेंडूंत फटकेबाजी करत 4 चौकार व 2 षटकार खेचत 29 धावा काढल्या. परवेज खानने 19 चेंडूंत 18 धावा केल्या. अमन शेखने 20 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 28 धावांचे योगदान दिले. इम्रान खाने 19 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद सर्वाधिक 34 धावांची विजयी खेळी केली. बाबाकडून विनायक भोईरने 19 धावा देत 3 गडी बाद केले. शेख अल्ताफ व सलमान अमदने प्रत्येकी एकाला टिपले.

एम्पायर स्टेटची आयकॉनवर मात

दुसऱ्या सामन्यात एम्पायर स्टेट संघाने आयकॉन स्ट्रायकर्सला 4 गड्यांनी पराभूत केले. प्रथम खेळताना आयकॉनने 15 षटकांत 9 बाद 104 धावा उभारल्या. अष्टपैलू ऋषिकेश पवारने 13 धावा देत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरात एम्पायर स्टेटने 14.2 षटकांत 6 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात ऋषिकेश पवारने 29 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. ऋषिकेश पवार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

बातम्या आणखी आहेत...