आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीत त्रास दिल्याचा राग:लग्नसमारंभात निवृत्त पोलिस कर्मचारी दिसताच बदडून गालाचा घेतला चावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवानिवृत्त सहकारी लग्नात दिसताच त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी पोलिस मुख्यालयात कार्यरत लक्ष्मीकांत पाथ्रीकरवर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १४ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त पोलिस दामोदर पवार हे सावंगी येथील दीपक लॉन्सवर लग्नात गेले होते. ते वधू-वरांना शुभेच्छा देऊन मंचावरून उतरत असतानाच लक्ष्मीकांतच्या नजरेस पडले. शहर पोलिस दलात सोबत असताना तू माझे नुकसान केले, असे म्हणत लक्ष्मीकांतने त्यांना मारहाण करत गालावर चावा घेतला.

बातम्या आणखी आहेत...