आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28.1% वाढीसह दारू विक्री:दारू विक्रीतून 4 हजार 14 कोटी रुपयांचा महसूल जमा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा एकट्या औरंगाबाद जिल्ह्याने दारू विक्रीचे ९६ टक्के लक्ष्य पूर्ण करत ५४ लाख ५४ हजार २२५ बल्क लिटर दारू रिचवली. त्यासोबतच एकट्या औरंगाबाद जिल्ह्याकडून तब्बल ४ हजार १४ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला असून मार्चअखेरपर्यंत ४ हजार १६६ कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असून ते लवकरच पूर्ण होईल, असे पोलिस अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले.

कोरोनाच्या तीन वर्षांमध्ये राज्याच्या एकूण दारू विक्री व निर्मितीवर सर्वाधिक परिणाम झाला. २०१६ ते २०२० पर्यंत एकूण विक्रीमध्ये सर्वाधिक ३२ टक्क्याने दारू विक्री व निर्मिती कमी झाली. परिणामी, राज्याला सर्वाधिक महसूल देणारा विभागच मागे पडल्याने राज्याच्या तिजोरीलाही त्याची झळ बसली. मात्र, कोरोना सरताच २०२१ मध्ये कमी झालेला महसूल सहा टक्क्यांपर्यंत पोहोचला. २०२२-२३ मध्ये मात्र २८.१ टक्क्यांनी महसुलात समाधानकारक वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोदावरीचे पाणी मद्य व बिअरनिर्मितीला अनुकूल असल्याने भविष्यात आणखी कंपन्या औरंगाबादला प्राधान्य देण्याची शक्यतादेखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अधीक्षक झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चअखेरपर्यंत ५ हजार २७५ कोटी रुपयांच्या महसुलाचे यंदाचे लक्ष्य आहे. जानेवारी २०२३ पर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ८४ कोटींचा अधिक महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...