आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शहरामध्ये दुसऱ्यांदा लूटमार; हॉटेलचालकाला रस्त्यात अडवून 40 हजार लांबवले

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडी परिसरात दुचाकीस्वाराला फोन पेवर पैसे मागून लूटमार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक लूटमारीची घटना समाेर आली आहे. १६ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत वाळूज पोलिस ठाण्यात २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रेमराज बिअर बारचे चालक सुनील गावंडे (३६) हे १६ जानेवारी रोजी रात्री ११:३० वाजता हॉटेल बंद करून दुचाकीने नगर राेडवरून घरी जात होते. यादरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून लाकडी दांड्याने मारहाण सुरू करत त्यांच्या खिशातील १५ हजार, तर मागील खिशातील २५ हजार असे एकूण ४० हजार रूपये रक्कम काढून घेतली. त्यानंतर आणखी मारहाण करत मोबाइल घेऊन पोबारा केला. दोन दिवसांपूर्वीच मुकुंदवाडी परिसरात अशीच घटना घडली हाेती. त्यापूर्वी गांधीनगर व कामगार चौकात टवाळखोरांनी गुंडगिरी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...