आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लातूर:मॉर्निंक वॉकला गेलेल्या ज्येष्ठाला ताशी 120 प्रति किमी गतीच्या कारने चिरडले, लातुरातील घटना

लातूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगात कार चालवण्याच्या छंदाने घेतला वृद्धाचा बळी

एका १९ वर्षीय कारचालक तरुणाने बेभान हाेत भरधाव चालवलेल्या कारखाली चिरडून माॅर्निंग वाॅकसाठी निघालेल्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा चिरडून मृत्यू झाला. हा संतापजनक प्रकार सोमवारी सकाळी सहा वाजता लातूरमध्ये घडला. विशेष म्हणजे घटनास्थळावरील लाेकांनी दिलेल्या माहितीनुसार कारची गती ताशी १०० ते १२० असावी.

लातूरच्या रामनगरमध्ये राहणारे तात्याराव मोहिते (७५) नेहमीप्रमाणे सकाळी पावणे सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. सहा वाजण्याच्या सुमारास ते नंदीस्टॉपसमोरील रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना अक्षरशा चिरडले. ही कार किमान १०० ते १२० प्रती ताशी वेगाने होती. या कारने मोहिते यांना फरपटत नेऊन चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी या कारने तेथून जात असलेल्या स्कुटीलाही जोरदार धडक दिली. त्यामध्ये स्कुटीवरून वृक्षारोपणासाठी जात असलेले संजय ढगे आणि अंजली हार्डे हे दोघे गंभीर जखमी झाले. अादित्य शिंदे याने मंगळवारी पहाटेपासूनच मॉर्निंग वॉकसाठी गजबज असलेल्या औसा रस्त्यावर ताशी १०० ते १२० वेगाने कार चालवली. मात्र वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

भरधाव कार चालवण्याचा तरुणाला छंद

कारचालक आदित्य संजय शिंदे हा केवळ १९ वर्षांचा असून तो सकाळी साडेपाच वाजता कारची चावी घेऊन घराबाहेर पडला. त्याने आपल्याला न कळवता चावी घेऊन कार नेल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. त्याला वेगाने कार चालवण्याचा छंद असल्याचेही ते म्हणाले.