आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम:दसरा मेळावा प्रवासासाठी शिंदे गटाचा स्वतंत्र ध्वज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र भगवा ध्वज वाहनांवर लावला जाणार आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असतील. लोकांना हजारो वाहनांनी मुंबईला नेले जाणार आहे. बहुतांश वाहने एकाच रस्त्याने चार किंवा पाच ऑक्टोबर रोजी जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. एका गटाचा कार्यकर्ता दुसऱ्या गटाच्या वाहनात जाऊ शकतो. म्हणून वाहनावर स्वतंत्र ध्वज लावण्याची संकल्पना पुढे आली. शिंदे गटाची ही संकल्पना लक्षात घेतली तर लवकरच उद्धवसेनेकडूनही उद्धव ठाकरे यांचा फोटो असलेले स्टिकर्स वाहनांवर लावण्याची सूचना येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...