आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर शिवारातील गलांडे वस्तीजवळ घडली घटना:समृद्धी महामार्गावर वेगाने 2 तास धावत्या कारने घेतला पेट, चारही प्रवासी सुखरूप

वैजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावर सुसाट धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक कारला वैजापूर शिवारातील गलांडे वस्तीजवळ गुरुवारी सांयकाळी ५ वाजता अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी करून वेळीच कार थांबवल्याने चारही प्रवासी अागीच्या तडाख्यातून सुखरूप वाचले. पुणे येथील नितीन राजपूत हे सहपरिवार सिंदखेड राजा येथून शिर्डीमार्गे पुण्याकडे रवाना हाेण्यासाठी कारने समृद्धी महामार्गावरून जात हाेते. वेगान असताना अचानक कारने पेट घेतला. अग्निशमन पथक येईपर्यंत गाडी जळून खाक झाली. पोलिसांनुसार कारची पासिंग २०१५ ची आहे.

शक्यता : वेग जास्त असल्याने वाहनाने घेतला पेट : समृद्धी महामार्गावर ताशी १०० ते १२० प्रतिकिमी वेगाने वाहन जात आहेत. त्यामुळे वायरिंगमध्ये घर्षण होऊन वाहन पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारीही असाच प्रकार झाला असल्याचा अंदाज महामार्ग पोलिस सुरक्षा पथकाचे उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...