आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:मुकुंदवाडीमधील लोखंडी पुलाजवळ अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदवाडी येथील लोखंडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून त्यामुळे रस्त्याची रुंदी एकीकडे कमी झाली आहे. दुसरीकडे रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने ऐन सिग्नल सुटल्यानंतर या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे तसेच अतिक्रमणांमुळे मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात व वाद होत असतात. अतिक्रमण काढून वाहनधारकांना शिस्त लावण्यात यावी, सर्व्हिस रोड करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यापारी करत आहेत.

एकीकडे जी-२० चे पथक शहरात येणार असल्याने रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाईही केली जात आहे. परंतु मुकुंदवाडी लोखंडी पुलाजवळील अतिक्रमणे मात्र काढण्यात आलेली नाहीत. विशेष म्हणजे संध्याकाळी या अतिक्रमित दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापला जातो. सिग्नल सुटल्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांनाही या बेशिस्त वाहनधारकांमुळे मोठी अडचण होते. मनपा प्रशासन व पोलिसांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

महिलांना चालणेही कठीण
आम्हाला आमच्या दुकानात बसणे तर सोडा, रस्त्यावरून महिलांना चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे रस्ता मोकळा करावा. सर्व्हिस रोड तयार केल्यास परिसरातील अडचणी सुटतील. - विजया पाटील, व्यापारी

वाट्टेल तेथे करतात पार्किंग
अतिक्रमणामुळे जागाच राहिली नाही. वाट्टेल तेथे वाहने लावण्यात येतात. जालना रोड मोठ्या रहदारीचा रस्ता असतानाही वाहनधारकांना शिस्त नाही. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.- शेख अल्ताफ, व्यापारी

अतिक्रमणावर कारवाई करू
अतिक्रमणांवर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.- वसंत भोये, उपायुक्त, मनपा

बातम्या आणखी आहेत...