आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाधिवक्ता पदाच्या निवडीसाठी मराठवाड्याला प्राधान्य द्या:औरंगाबाद खंडपीठ वकील संघाची निवेदनद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अनेक न्यायमूर्ती दिलेले आहेत. येथे अभ्यासू विधिज्ञ आहेत. आतापर्यंत राज्याच्या महाधिवक्तापदी बहुतांशवेळा मुंबई अथवा नागपूर येथील विधिज्ञास नियुक्ती मिळालेली आहे. त्यामुळे यापुढील नियुक्ती होताना औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ, अभ्यासू विधिज्ञास महाधिवक्तापदी काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यासंदर्भातील माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी व ॲड. सचिव सुहास उरगुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. त्यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत महाधिवक्तापदाच्या नियुक्तीमध्ये मराठवाड्यातील एकाही व्यक्तीला काम करण्याची संधी मिळालेली नाही. औरंगाबाद खंडपीठ ही राज्यातील महत्त्वाची न्यायालयीन संस्था आहे. खंडपीठांतर्गत बारा जिल्हे येतात. येथील विधिज्ञांची उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या जागी नियुक्ती, निवड झालेली आहे. अनेक असे ज्येष्ठ विधिज्ञ असून त्यांना सरकारी वकिल म्हणून कामाचा मोठा अनुभव राहिलेला आहे. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. सामाजिक जाणिव आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई, नागपूरमधीलच विधिज्ञांना महाधिवक्ता म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे.

समान यांच्या भूमिकेत मुळे मराठवाड्याला संधी द्यावी.औरंगाबाद खंडपीठाचे कार्यक्षेत्र बारा जिल्ह्यात विभागलेले आहे. महाधिवक्ता पदी नियुक्ती मिळाल्याने तरुण वकिलांना प्रेरणा मिळेल. खंडपीठाच्या स्थापनेला चाळीस वर्ष होत असल्याने एक गौरवपूर्ण काम होईल. खंडपीठ व मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांच्या न्यायिक कामकाजाला गती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...