आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी. राज्यात ‘टेस्ट- ट्रॅक- ट्रीट- व्हॅक्सिनेशन’वर भर दिला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, तर राज्यात टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुबलक बेड, औषधी, ऑक्सिजन उपलब्ध; ९.१६ कोटी लोकांना लसीचे सुरक्षा कवच
पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यामुळे २ वर्षांत मुबलक बेड, औषधी, ऑक्सिजन उपलब्ध झाला. आतापर्यंत १७ कोटी ७६ लाख लसींचे डोस दिले गेेले. त्यात पहिला डोस- ९.१६ कोटी, दुसरा डोस ७.६५ कोटी तर बूस्टर डोस ९४.२८ लाख लोकांनी घेतला. या लोकांमध्ये अँटिबॉडीजचे सुरक्षा कवच आहे.
गर्दीत मास्क घालावा, सॅनिटायझर वापरा, अफवांवर विश्वास नको : डॉ. अविनाश सुपे
कोविड टास्क फोर्सचे माजी सदस्य व केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे म्हणाले, ‘लोकांनी फार घाबरण्याची गरज नाही, पण गर्दीच्या ठिकाणी किंवा विमानाने प्रवास करताना मास्क वापरा. सॅनिटायझरचा वापर सुरू करा. कोणतीही लक्षणे दिसल्यास तपासणी करावी. अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.