आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तेची चौकशी:मुंबईतील आयआयटीचे पथक सोमवारी करणार शहरातील रस्त्यांची पाहणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी ७ नोव्हेंबर रोजी आयआयटीचे पथक शहरात येणार आहे. ३१८ कोटी रुपये खर्च करून १११ रस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र निधीअभावी ही यादी २२ रस्त्यांवर आली. ठेकेदाराने निविदा ४० टक्के कमी दराने घेतल्याने याची गुणवत्ता योग्य राहावी म्हणून आयआयटी मुंबईने लक्ष ठेवावे असे ठरवण्यात आले. त्यानुसार एप्रिल महिन्यात प्रा. धरमवीरसिंग यांच्या नेतृत्वाखाली पथक शहरात आले हाेते. त्यांनी रस्त्यांचे डिझाइन अंतिम केले आहे. एकाच कंत्राटदाराने हे काम घेतले आहे. एक रस्ता तयार करण्यासाठी किमान दोन महिने लागत आहेत. स्मार्ट रस्त्यांच्या आजूबाजूला फुटपाथवर पेव्हर ब्लॉकही बसवले नाहीत. मनपा आणि स्मार्ट सिटीतील कामात कोणताच फरक नागरिकांना दिसून येत नाही.

बातम्या आणखी आहेत...