आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट बस:जळालेल्या स्मार्ट बसची टाटा कंपनीच्या पथकाने केली पाहणी

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड ते औरंगाबाददरम्यान वरूड फाट्याजवळ १८ सप्टेंबर राेजी स्मार्ट सिटी बस जळाली हाेती. या बसची बुधवारी टाटा कंपनीच्या पथकाने तपासणी केली. हे पथक दिल्ली येथील टाटा मोटार्सच्या मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल पाठवणार आहे. त्यानंतर हा अहवाल स्मार्ट सिटीच्या सीईओंना मिळेल. त्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल.

स्मार्ट सिटी बसला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली असून टाटा कंपनीचे पथक तपासणी करेल, असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले होते. त्यानंतर टाटा कंपनीच्या चार जणांचे पथक बुधवारी येऊन पाहणी करून गेले. या पथकात धारवाड येथील टाटा कंपनीचे बॉडी बिल्डिंग विभागाचे अभियंता, पुणे येथील टाटा प्लँटचे दोन अधिकारी आणि आरएनडी विभागाचे एक अधिकारी होते. पथकाने बसची पाहणी केल्यानंतर स्थानिक अधिकारी व टाटा सर्व्हिस सेंटरमधील मेकॅनिककडून माहिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...