आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:पारंपरिक गोरर्शे नृत्य, गाण्यांच्या तालावर साजरा तिबेटियनांचा उत्सव

रोशनी शिंपी। औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिबेटियन स्क्वेअर मार्केटमध्ये शनिवारी सकाळीच पारंपरिक वेशभूषेतील जवळपास १३० ते १५० तिबेटी जमले होते. तिबेटियन संदेश लिहिलेल्या पताका, धुपाची दरवळ असा देखणा उत्सव रंगला होता. दलाई लामांच्या प्रतिमेला ‘खता’ (पांढरा रुमाल) अर्पण केली. केक कापून जल्लोषही केला. तिबेटियन संस्कृतीनुसार हातात मैदा घेऊन लामांसाठी प्रार्थना केली. ‘डेसी’ आणि ‘फ्युऐचा’ म्हणजे गोड भात, चहाचा आस्वाद सर्वांनी घेतला. पारंपरिक लोकगीतावर ताल धरला.

४३ वर्षांपासून शहरात व्यवसायानिमित्त येणारे तिबेटियन नागरिक धर्मगुरू दलाई लामांना नोबेल पुरस्कार मिळालेला दिवस साजरा करतात. डोंगराळ प्रदेशातील या तिबेटियन नागरिकांची लोकगीत, संगीत, पारंपरिक ड्रामियन, टेलिन, टिंपनी या वाद्यांवर आधारलेली आहे. कराओके ट्रॅकवर त्यांनी गाणी गायली. उपस्थितांनी याला प्रतिसादही दिला.

ताशींनी कापला केक भारतीय संस्कृतीशी साधर्म्य असल्याने मोठ्यांना सन्मान देतात. ग्रुपमधील सर्वाधिक वयाच्या (८५ वर्षे) ताशी ल्हमों यांच्या हस्ते केक कापला.

आमची दिवाळी, सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग
उत्सवात नाच, गाणे, खाणे यामध्ये सर्व जणांचा सहभाग असतो. हा उत्सव सर्व वयोगटातील सदस्यांसाठी दिवाळीसारखा आहे.तेंझिन ल्याग्हेल, अध्यक्ष तिबेटियन स्वेटर मार्केट

शांती आणि समता आमच्या जीवनाचे सूत्र
चाळीस वर्षांपूर्वी मी येथे आलो. आमचे उत्सव नेहमी साजरे करतो. आमची संस्कृती आणि धर्म आम्हाला शांती आणि समतेच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देत असल्याने आमचा उत्सव आनंदाने पण शांततेने साजरा होतो. एस. टी. चोपेल, तिबेटियन नागरिक,

तसेटेन डोलकेरचे हिंदी गाणे रंगले
भारतीय सैन्यात असलेल्या तसेटेन डोलकेर उत्सवासाठी सुटी घेऊन आली होती. तिच्या बहिणीचे मार्केटमध्ये दुकान आहे. तिने ‘कोई भी ना तुमसा मिला’ हे गाणे सुरेल गायले. याला सर्वांनी जोरदार जल्लोषाने पसंती दिली.

बातम्या आणखी आहेत...