आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राखेची वाहतुक करणाऱ्या टिप्परने लग्नाहून परतत असलेल्या ऑटोला जोराची धडक दिल्याने ऑटोमधील चार जण जागीच ठार झाल्याची घटना परळी- गंगाखेड रोडवरील निळा गावाजवळ रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली. या अपघातातील सर्व मृत हे अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत.
परळी-गंगाखेड मार्गावर परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची विनापरवाना अजूनही सर्रासपणे वाहतुक होत आहे. राख वाहतुक करणारे टिप्पर चालक हे भरधाव वेगात चालवत असल्याने सातत्याने अपघात होत आहेत. रविवार 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ( हरंगुळ ता.गंगाखेड) येथील टिप्पर परळीहून राख भरुन गंगाखेडकडे निघाले होते. याच वेळी गंगाखेड तालुक्यातील झोला पिंप्री येथून लग्न समारंभ आटोपून अंबाजोगाई कडे जात असलेल्या ॲटोला परळी-गंगाखेड मार्गावरील निळा शिवारात टिप्परने धडक दिली. या अपघातात ॲटोमधील विशाल बागवाले ( वय 20),दत्ता भागवत सोळंके (वय 25) ,आकाश चौधरी ( वय 23) आणि ॲटो चालक मुकुंद मस्के (वय 22) सर्व राहणार अंबाजोगाई हे चार जण जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर एक तासाने गंगाखेड, सोनपेठ व महागार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले असुन चौघांचे मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.हा अपघात एवढा भीषण होता की मृतांपैकी तिघांचे मृतदेह टिप्परच्या समोरील चाकाखाली अडकले होते.स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.