आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात गुरुवारी एकूण 568 जणांचा बळी, 67,013 रुग्ण; विदर्भात कोरोनाचे 259, मराठवाड्यात 166 मृत्यू

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गुरुवारी कोरोनाचे ६७,०१३ नवे रुग्ण आढळले. यातील १५,७३२ विदर्भातील तर मराठवाड्यातील ७८०० रुग्णांचा समावेश आहे. राज्यात एकूण ५६८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात विदर्भाचे २५९ आणि मराठवाड्याचे १६६ रुग्ण आहेत.

मराठवाड्यात ७८०० पॉझिटिव्ह, १६६ मृत्यू : मराठवाड्यात गुरुवारी ७८०० रुग्ण, १६६ मृत्यू झाले. ७१ हजार ०५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संख्या अशी : औरंगाबाद १४५८ (३०), जालना ५५१ (१०), परभणी १२२० (१९), हिंगोली ३३९ (६), नांदेड १०९९ (२७), लातूर १२६९ (३८), उस्मानाबाद ७१९ (२१), बीड ११४५ (२१ मृत्यू).

विदर्भात रुग्णवाढीचा वेग थांबेना, १५ हजार नवे रुग्ण
अमरावती | विदर्भात कोरोनामुळे गुरुवारी २५९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५ हजार ७३२ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १८५ जणांमध्ये नागपूरच्या ११०, चंद्रपूर ३८, गाेंदिया २३, भंडारा १४, वर्धा ९ तर गडचिराेलीच्या एकाचा समावेश आहे. प. विदर्भात ७४ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३७ तर अमरावती २३, अकाेला १०, बुलडाणा ३ तर वाशीम जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. नागपूर विभागात ११,७९९, तर अमरावती विभागात ३९३३ नवे रुग्ण आढळले. विदर्भात एकूण रुग्ण ७ लाख ३९ हजार ७६ वर पोहोचले, तर मृतांची संख्या १२ हजार ८७ झाली. आतापर्यंत ५ लाख ८३ हजार ४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...