आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओची एडिटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल; तरुण ताब्यात:‘समृद्धी’वर खेळण्यातील बंदूक घेत केला होता स्टंट

फुलंब्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावरील बोगद्याजवळ अग्निशस्त्रातून हवेत फायरिंग करत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला पाेलिसांनी ताब्यात घेतले.

व्हिडिओतील व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती. फुलंब्री पोलिसांच्या पथकाने चंद्रकांत ऊर्फ बाळू कैलास गायकवाड (३०, रा. बेगमपुरा) याला ताब्यात घेण्यात आले. व्हिडिओत दिसणाऱ्या शस्त्राबाबत सखोल चौकशी केली असता त्याने खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक वापरल्याचे सांगितले. परंतु, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याआधी मित्राने व्हिडिओ एडिट करून त्यात अग्निशस्त्राचा स्पेशल इफेक्ट व साउंड देत बनवल्याचे कबूल केले. सीआरपीसी ४१/१ प्रमाणे युवकाला नोटीस देण्यात आली. एडिटिंगमध्ये खेळण्यातील बंदुकीला खऱ्या बंदुकीचा इफेक्ट कशा प्रकारे दिला या बदलाचे प्रात्यक्षिक तरुणांनी पोलिसांना करून दाखवले.

स्टंटबाजी करणाऱ्यांवर गुन्हे ^सार्वजनिक ठिकाणी तसेच सोशल मीडियावर स्टंटबाजी करून धोकादायक शस्त्रांसह फोटो, व्हिडिओ टाकून समाजात दहशत पसरवण्याचा प्रकार झाल्यास कठाेर कारवाई करण्यात येणार आहे. - मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.

बातम्या आणखी आहेत...