आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 डिसेंबरला समारोप:तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 50 एकर जागेत ट्रेनिंग सेंटर उभारणार : सहकारमंत्री सावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी शहरात येतात, तेव्हा उद्योजकांना पुन्हा त्यांच्यावर वर्षभर मेहनत घ्यावी लागते. हे थांबावे आणि शहरातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी इतर राज्य व शहरांत जाण्याची गरज भासू नये, याकरिता आगामी काळात ५० एकर जागेवर अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा ट्रेनिंग सेंटरची उभारणी करणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या शहरावर ‘खास प्रेम’ आहे. त्यामुळे ते दोघेही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्यानगर मैदान, आरटीओ कार्यालय परिसरात १६ ते १९ डिसेंबरदरम्यान आयाेजित आयसा इंजिनिअरिंग एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.

या वेळी सीआयआयचे चेअरमन आणि अँड्रेस हाऊजर कंपनीचे संचालक श्रीराम नारायणन, आयसाचे अध्यक्ष सूरज डुमणे, ग्लोब टेकचे सतीश मंडोले, सामाचे वीरेंद्र जोहरी उपस्थित होते.

१५० उद्योग समूहांचे स्टाॅल : इंजिनिअरिंग एक्स्पोत विविध राज्यांतून १५० उद्योग समूहांनी प्रतिसाद देत स्टॉल उभारले आहेत. त्यात ६७ स्टॉल सुरक्षा साधनेे तर उर्वरीत इंजिनिअरिंग विभागाशी संबंधीत आहेत. यातून देशभरातील शेकडो उत्पादक, नवीन तंत्रज्ञान, सेवा-उद्योगाचे प्रदर्शन घडत आहे.

हे घेताहेत परिश्रम
एमएसएमई, सीएमआयए, मासिआ, माकिआ, व्यापारी महासंघ, एमसीटीसी, आयएमएम आदी संघटनांचे सहकार्य लाभत असून चारदिवसीय एक्स्पोच्या यशस्वितेसाठी संघटनेचे अध्यक्ष सूरज डुमणे, सहप्रकल्पप्रमुख जयराज पाटील, राजेश वैष्णवसह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. विद्यार्थी, शिक्षकांनी भेट देण्याचे आयोजकांनी आवाहन केले.

ऐंशीच्या दशकामधील प्रवास आज प्रगतिपथावर
ऐंशीच्या दशकात औरंगाबादची औद्योगिक भरभराट सुरू झाली. पूर्वी चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसी होती. आज डीएमआयसी, आॅरिक सिटीच्या माध्यमातून शहर विकासाच्या नवीन शिखरावर पोहोचत आहे. त्यासाठी शहरातील उद्योजक, लघुद्योजक, व्यावसायिक परिश्रम घेत आहेत, असे मंत्री सावे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...