आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेण्यांची सफर:बॅटरीच्या गाड्यांत बसून वेरूळ लेण्यांची सफर ; 14 गाड्या सुरू करणार असल्याची माहिती

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळच्या ३४ लेण्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पण ज्येष्ठ नागरिक तसेच वेळेअभावी अनेकदा पर्यटकांना सर्व लेण्या पाहता येत नाहीत. त्यामुळे लेणी पाहण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या १४ गाड्या सुरू करणार असल्याची माहिती पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली. बॅटरीवरील गाड्या चालवण्यासाठी लेणीतील रस्ता सपाट असणे गरजेचे होते. त्यामुळे आधी रस्त्यांची कामे करण्यात आली. गाड्यांची पहिली चाचणी घेण्यात आली. आता लवकरच या गाड्या धावतील. यात बसून सर्व लेण्या पाहता येतील. तिकीट दर साधारण २५ रुपये असेल.

आमदार दानवेंची प्रतीक्षा

पुरातत्त्व विभागात गाड्या सज्ज असल्याने लवकरच ही सेवा सुरू करण्याचे नियाेजन हाेते, पण आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी विभाग ताटकळला आहे. दानवेंनी वेळ दिल्यास तत्काळ ही सेवा सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...