आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दौलताबादजवळ ट्रकने ॲपेला उडवले; बालकासह महिलेचा मृत्यू, 11 जखमी

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुसाट वेगात जाणाऱ्या बोअरवेलच्या ट्रकने एका ॲपेरिक्षाला उडवले. वेग प्रचंड असल्याने रिक्षा जागेवरच उलटला. या भीषण अपघातात ऑटाेतील दहा वर्षीय बालकासह ४० वर्षोय महिलेचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद - लासूर रस्त्यावरील देवगिरी व्हॅलीसमोर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सायराबी खान आणि आयान अशी मृतांची नावे आहेत. ते रांजणगाव शेणपुंजीचे रहिवासी होते. रांजणगाव येथील कुटुंब ॲपेरिक्षाने एका घरगुती कार्यक्रमासाठी लासूरला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण एका रिक्षातून लासूरकडून घराच्या दिशेने निघाले. दौलताबाद परिसरातील देवगिरी व्हॅलीसमोरून जात असताना वळणावर सुसाट वेगात जाणाऱ्या बोअरवेलच्या ट्रकने रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला व त्याने थेट रिक्षाला समोरून धडक दिली. वेग प्रचंड असल्याने अवजड ट्रकच्या धडकेत रिक्षा दोन ते तीन वेळेस उलटली. यात सायराबी खान आणि आयान यांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत.

दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...