आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू:50 हजारांची दारू विकत घेणाऱ्या ट्रकचालकाला रंगेहाथ पकडले

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारूबंदी असल्याने औरंगाबादेत माल उतरवण्यासाठी आलेल्या ट्रकचालकाने शहरातून महागड्या दारूच्या २१ बाटल्या खरेदी केल्या. मात्र, औरंगाबाद सोडण्यापूर्वी दारूबंदी पथकाने त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. २१ सप्टेंबर रोजी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड गस्तीवर असताना त्यांना एक व्यक्ती ५० हजारांच्या २१ दारूच्या बाटल्या विकत घेत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

त्यांनी सापळा लावला असता ट्रकचालक विपिन बालगिरी गोस्वामी (२९, रा. लालपूर, जामनगर, गुजरात) याने ओअॅसिस चौकातील वाइन शॉपमधून गुजरातमध्ये विकण्यासाठी स्कॉचच्या २१ बाटल्या विकत घेताना पकडला गेला. अवघड यांच्यासह मनोज चव्हाण, सुनील जाधव, परशुराम सोनुने, नितेश सुंदर्डे, अभिजित गायकवाड, आरती कुसाळे यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...