आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कोळशा शिवारात ट्रक उलटल्याने एका मजूरासह 80 मेंढ्या दगावल्या, पाच जणांना वाचविण्यात यश

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे.

हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात राजस्थानातून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक शनिवारी ता. 21 पहाटे चार वाजता उलटला. या अपघातात ट्रक मधील एका मजूराचा मृत्यू झाला असून 80 मेंढ्याही दगावल्या आहेत. तर गावकऱ्यांच्या सतर्कतेने पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-33-एच 7455) 180 मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमधे पाच मजूर देखील होते.

सदर ट्रक आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात आला असतांना चालक सत्येंद्रसिंह चव्हाण (रा. मध्यप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊ पलटी झाला. यावेळी मोठा आवाज झाल्याने कोळसा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी अपघातात किरकोळ जखमी झालेल्या चालकासह पाच सुखरूप बाहेर काढले. मात्र अमरसिंह (50, रा. टोक, राजस्थान) याचा मृत्यू झाला. अमरसिंह हा ट्रकमधे मागील बाजूस बसला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंह मेंढ्याखाली गुदमरून ठार झाला असून या अपघातात ट्रकमधे असलेल्या 180 पैकी 80 मेंढ्याही दगावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार कामाजी झळके, एस. डी. नरवाडे यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...