आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलाढाल:यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दहा कोटी रुपयांची उलाढाल; दिवसभरात जिल्ह्यातील उलाढाल 10 कोटींच्या घरात गेल्याचा दावा सराफा व्यापाऱ्यांनी केला

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे मंगळवारी दिवसभर सराफा बाजारात थोड्याफार प्रमाणात रेलचेल पाहायला मिळाली. दिवसभरात जिल्ह्यातील उलाढाल १० कोटींच्या घरात गेल्याचा दावा सराफा व्यापाऱ्यांनी केला आहे.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून पाळला जातो. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१ हजार १८०, तर २२ कॅरेटचा भाव ४८ हजारांच्या आसपास चालू असून त्यावर ३ टक्के जीएसटी लावून सदरील भाव ५३ हजारांच्या वर होता. तसेच, चांदी प्रतिकिलो ६४ हजारांवर होती.

दरम्यान, शहरातील सराफा बाजार, त्रिमूर्ती चौक, सिडको-हडकोसह ग्रामीण भागातील सराफा बाजारात काही प्रमाणात सोन्याची खरेदी-विक्री चालू होती. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने ग्राहक सुद्धा खरेदीसाठी बाहेर पडत नव्हते. तसेच, महागाई वाढल्याने सोने खरेदीला थोडाफार फटका बसल्याचे सराफ सुवर्णकार फेडरेशन औरंगाबादचे विभागीय अध्यक्ष दिनेश दहिवाल यांनी सांगितले. पी. एन. गाडगीळ शोरूमचे प्रीतम बोरा म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळसूत्र, नेकलेस खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक म्हणाले, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांचा लग्नसराईनिमित्त दागिने खरेदीकडे कल होता.

बातम्या आणखी आहेत...