आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच लेणीसमोर रंगला नृत्योत्सव:जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्त्व विभागातर्फे अनोखा कार्यक्रम

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नृत्यातील प्रतिमा लेण्यांमध्ये दिसतात. शिल्पच नृत्य करु लागली आहेत, याची प्रचिती औरंगाबाद लेणीसमोरील नृत्याेत्सवात आली. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त हे पहिलेच आयोजन रोमांचक ठरले. महागामी गुरुकुलाच्या पार्वती दत्ता आणि शिष्यांचे हे सादरीकरण संस्मरणीय ठरले. संधिप्रकाशाच्या छायेत गुलाबी थंडीत लेणीसमोरील या नृत्याचे शेकडो रसिक साक्षीदार झाले. हळुवार घुंगरांचे बोल, कार्यक्रमाला साजेशी प्रकाशयोजना एक ऐतिहासिक अनुभव ठरला.यावेळी मंगलाचरण-सूर्याष्टकम, ‘देश पल्लवी’ पुष्पम आणि शेवटी बौद्ध मंत्र ‘ओम मणि पद्मे हुम’ या रचना शीतल भामरे, एेश्वर्या मुंदडा, आद्या शिंदे, भार्गवी मेटेकर यांनी सादर केल्या. सारंग अर्धापूरकर यांनी सितारवादन केले. रसिकांसाठी हा सुखद अनुभव ठरला.

ही उत्तम सुरुवात औरा औरंगाबाद शृंखलेतून हा संबंध मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. नऊ वर्षांनी आम्ही ऐतिहासिक वास्तूच्या प्रांगणात सादरीकरण करत आहोत. ही एक उत्तम सुरुवात राहील. पार्वती दत्ता, संचालक, महागामी

बातम्या आणखी आहेत...