आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिझर्व्ह बँकेने महागाई रोखण्यासाठी ब्रह्मास्त्र वापरून चार वर्षांनंतर रेपो दर वाढवला आणि तोदेखील जागतिक भौगोलिक-राजकीय-आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे अशा वेळी, त्यामुळे या विलंबाचे परिणाम आणखी गुंतागुंतीचे झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर आता घर खरेदी करणाऱ्या किंवा कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांचे हप्ते वाढणार आहेत.
यासोबतच सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) वाढल्यामुळे बाजार आणि बँकेतून रोख रक्कम काढली जाईल. या दोन्ही पावलांचा परिणाम असा होईल की, लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे कमी होतील आणि नंतर महागाईवर प्रभावी परिणाम शक्य होईल. पण, लोक महागड्या कर्जाच्या भीतीने घरे खरेदी करणार नाहीत तेव्हा त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बहुआयामी होईल. त्यामुळे स्टील, सिमेंट, विटांचे उत्पादन थांबून मजूर बेरोजगार होतील. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, अन्नधान्य, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडतील आणि त्याचा फटका आणखी दोन वर्षे सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. अर्थात, महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला रेपो दरात आणखी वाढ करावी लागेल. गेल्या दोन वर्षांत महागाई ४-६ टक्क्यांच्या श्रेणीत सातत्याने वाढत आहे. गेल्या ऑगस्टपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. सध्या बँकांसाठी इकडे आड-तिकडे विहीर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.