आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच स्वीकार:दोन हजारांची लाच मागणारी सा.बां.विभागाची महिला लिपिक अटकेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांच्या सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षणात पंधरा दिवसांची सूट देण्यासाठी महिला लिपिकाने कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये मागितले. कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाच स्वीकारताना सीमा दिनकर पवार हिला रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदार लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहे. १ जानेवारीला प्रशिक्षण सुरू झाले. मात्र, फेब्रुवारीत १५ दिवसांची सुटी हवी होती. ती मंजूर करण्यासाठी पवारने दाेन हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी कार्यालयात सापळा लावला. पवारला तक्रारदाराने संपर्क केला असता ती कार्यालयाबाहेर आली अन् पैसे स्वीकारले.

४० हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञावर गुन्हा
तीन ते चार वेळा सापळा रचूनही रंगेहाथ पकडला न गेलेल्या महावितरणचा तंत्रज्ञ अनिल आसाराम गरंडवाल (३२) याच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकाच्या व्यावसायिक वीज मीटरमध्ये बदल करून देण्यासाठी त्याने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने काही महिन्यांपूर्वी शेंद्रा येथील महावितरणच्या कार्यालयात त्यांच्या उद्योगाचे इंडस्ट्रियल मीटरचे कमर्शियल मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज केला होता.

बातम्या आणखी आहेत...