आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची पोत हिसकावून पाेबारा:वैजापूरमध्ये महिलेची 40 हजार रुपयांची सोन्याची पोत लांबवली

वैजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रोटेगाव स्टेशन रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून पाेबारा केला.

प्रतीक्षा विजय जोशी (रा. मारवाडी गल्ली, वैजापूर) या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्योती पवार या दोघी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वॉकिंगला स्टेशन रोडकडे जात हाेत्या. दरम्यान, इनफिल्ड बुलेट शोरुमजवळ त्यांच्या पाठीमागून बजाज पल्सर दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वर्ष वयोगटातील दोन चोरट्यांनी प्रतीक्षा यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याची पोत हिसकावून पसार झाले. वैजापूर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला.

धाडसी चोऱ्याचे सत्र सुरुच : वैजापूर शहरात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. भरदिवसा १५ लाख ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेल्याचे प्रकारानंतर वाहतूक रस्त्यावर महिलांचे गळ्यातील मौल्यवान दागिने हिसकावण्याच्या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...