आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक हिंसाचार:लग्नाच्या वेळी माहेरहून आणलेले दागिने परत घेण्याचा महिलेला हक्क; न दिल्यास सासरच्या मंडळींवर फौजदारी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरच्या लोकांनी मुलीला लग्नात दिलेल्या वस्तू सासरच्या मंडळींनी उद्देशपूर्वक हडप केल्यास ही फसवणूक असल्याचे कौटुंबिक हिंसाचार कायद्यात म्हटले आहे. एखाद्या महिलेला लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असेल तर तिला लग्नात मिळालेले दागिने सासरकडून परत घेण्याची तरतूद कौटुंबिक हिंसाचार कायद्यात तरतूद आहे. पण यासाठी संबंधित वस्तूंची पावती सादर करणे आवश्यक आहे. अशाच एका प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एल. रामटेके यांनी जवाहरनगर पोलिसांना एका महिलेचे माहेरहून आलेल्या स्त्रीधनासंबंधी फौजदारी दंडसंहिता प्रक्रियेच्या कलम २०२ अन्वये चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांत यासंबंधी अहवाल दाखल करण्यास पोलिसांना सांगितले आहे.

एक दांपत्य वादविवादानंतर २०१८ पासून वेगवेगळे राहू लागले. लग्नात पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी मुलीसोबत ११ लाख रुपयांच्या मौल्यवान दागिने व वस्तू दिल्या होत्या. दोघात बिनसल्यामुळे पत्नीने माहेरहून आणलेले आणि सासूकडे ठेवलेले दागिने परत मागितले. मात्र सासरच्या मंडळींनी नकार दिला. ते मिळवण्यासाठी मार्च २०२१ मध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १५६ (३) नुसार आणि भादंवि कलम ४२०, ४०३, ४०६, ५०४, ५०६ नुसार प्रकरण अॅड. रमेश घोडके पाटील यांच्या वतीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आले कौटुंबिक हिंसाचार कायद्याचे कलम १८ (इ) नुसार दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे अथवा एकट्याने मौल्यवान वस्तू ज्यात, स्त्रीधनाचा समावेश केलेला आहे, अशा वस्तू न्यायालय स्वतंत्र आदेश देऊन मागवू शकते अशी तरतूद आहे. मौल्यवान वस्तू ज्याच्या असतील त्याला द्याव्या लागतात. या प्रकरणात पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यामुळे तिने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर महिलेने दावा केलेल्या दागिन्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने जवाहरनगर पोलिसांना दिले. दोन आठवड्यात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...