आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शहरातील निसर्गप्रेमी व्यक्ती व संस्थांनी एकत्र येत सुमारे १ लाखाहून अधिक झाडे एकाच वेळी लावण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली असून त्याला शैक्षणिक, सामाजिक संस्थांसह विविध शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, उद्योग, संघटनांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १२ या एक तासाच्या वेळेतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी १ लाख झाडे लावण्याचा हा उपक्रम आहे. त्यासाठी ४ हजार स्वयंसेवकांची एक टीम काम करत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून ५ लाख लोक जोडण्याचाही मानस विश्वविक्रमी वृक्षारोपण सोहळा समितीने व्यक्त केला आहे. या विश्वविक्रमी उपक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे घेतली जाणार आहे. ९०४९०४५२८५ या क्रमांकावर संपर्क साधून शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. राजीव गांधी शॉपिंग सेंटर, शॉप नं. २८, गुलमोहर कॉलनी सिडको येथून नोंदणीप्रमाणे झाडांचे वाटप १० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण त्यांची १५ ऑगस्ट रोजी ११ ते १२ या वेळेतच झाडे लावायची आहेत. केवळ झाडे लावणे हा या उपक्रमामागचा उद्देश नसून ती जगवण्यासाठीही समितीच्या वतीने पुढील वर्षभर मार्गदर्शन केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.