आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कतार या देशातून औंढा नागनाथ येथे आलेला तरुण कोरोना पॉझीटिव्ह

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतार या देशातून औंढा नागनाथ येथे दाखल झालेला २६ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा अहवाल बुधवारी (ता. १७) शासकीय रुग्णालयात प्राप्त झाला आहे. याशिवाय इतर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता हिंगोली जिल्ह्यातील कोरोना  पॉझिटिव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या २३३ झाली आहे. त्यापैकी २०० रुग्ण बरे झाले आहेत.

याबाबत आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एक तरुण मागील काही वर्षापासून कतार येथे कामासाठी गेला होता. तो तरूण गुरूवारी ता. ११ कतार येथून मुंबई येथे आला. त्यानंतर  मुंबई येथून खाजगी वाहनाने औंढा नागनाथ येथे दाखल झाला. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीने त्या तरुणास औंढा नागनाथ येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. शनिवारी ता. १३ त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवाय कळमनुरी तालुक्यातील टव्हा येथे दिल्ली येथून एक सत्तावीस वर्षाचा तरुण दाखल झाला होता. त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असून तो गावालगत एका शेतात थांबला होता. त्यामुळे आता आरोग्य विभागाने त्याची सर्व चौकशी करण्यास सुरुवात केलीआहे.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांच्या पथकाकडून माहिती घेतली जात आहे. टव्हा हे गाव क्वॉरंटाईन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच राज्य राखीव दलाचे दोन जवानही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान सध्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३३झाली असून त्यापैकी २०० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या उपचार सुरू असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...