आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना असे लिहित, पिंपळवाडी येथे अभियंता तरुणाने केली आत्महत्या, भाड्याच्या घरात घेतला गळफास

पैठण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या साेलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील एका २५ वर्षीय युवकाने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. निखिल दत्तात्रय चौंडाळे (रा. आदर्शनगर, पिंपळवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या युवकांच्या रूममध्ये अनेक प्रेमपत्रे आढळून आली असून यात “तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना’ असे पत्रही आढळून आले आहे.

निखिल चौंडाळे पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर काम करीत होता. आज त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. निखिल राहत असलेल्या खोलीमध्ये काही प्रेमपत्रे पोलिसांना आढळून आली. त्यामुळे प्रेमप्रकरणातून युवकाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...