आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पत्नी बाळासह माहेरी निघून गेल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी चार महिन्यांच्या बाळासह माहेरी निघून गेल्याने तणावाखाली गेलेल्या २३ वर्षीय सुनील रघुनाथ जगधने या तरुणाने आयुष्य संपवले. गुरुवारी सकाळी एन-१२ च्या फरशी मैदानावरील एका झाडाला तो लटकलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येपूर्वी त्याने खिशात चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला आहे. त्यावरून नंदा काकासाहेब अहिरे, काकासाहेब अहिरे (रा. नेरूळ, मुंबई), पप्पू आव्हाड, आनंद भालेराव, अनिल घुले ऊर्फ पिंटू, वंदना घुले (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीड वर्षापूर्वीच सुनीलचे लग्न झाले होते. प्लंबिंगची कामे घेऊन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या सासरच्यांनी घर सोडून त्यांच्या गावाला स्थायिक होण्याचा हट्ट सुरू केला. त्यातून सातत्याने त्रास देणे, धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरू झाले. ६ मार्च रोजी सुनील आणि पत्नी निकिता यांच्यात किरकोळ वाद झाले. त्यानंतर सासरची मंडळी मुलगी व नातवाला घेऊन गेली. त्याच सायंकाळी सुनील घरातून बाहेर पडला, तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने त्याचा सगळीकडे शोध घेतला. त्यांनी ७ मार्च रोजी सिडको पोलिसांत सुनील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, ९ मार्च रोजी त्याचा झाडाला लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिसांना त्याच्या पँटच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात सासरच्या काही लोकांची नावे लिहिली होते. सुनीलच्या वडिलांनी त्याआधारे तक्रार दिल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. या प्रकरणात सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...