आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरणापूर शिवारातील एका शाळेच्या मैदानातील लिंबाच्या झाडाला शालीकराम सुसर (२९, रा. श्री कृष्णनगर, रांजनगाव) या तरुणाने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार १२ डिसेंबर रोजी उघडकीस आला असून दौलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. विशेष म्हणजे शालीकरामने शाळेच्या मैदानातील झोक्याची दोरी तोंडून लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता विद्यार्थी व शिक्षक प्रार्थनेसाठी मैदानावर गेले. तेव्हा विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याचे सहायक निरीक्षक संजय गिते, उपनिरीक्षक राठोड, महेश घुगे राजेश पाटील, प्रभाकर पाटेकर घटनास्थळी गेले. त्यांनी त्याचे खिसे तपासले असता मोबाइल, रुमाल व काही सुटे पैसे आणि गाडीची चावी आढळली. त्याने घातलेल्या शर्टच्या खिशावर एका कंपनीचा लाेगाे आणि नाव होते. त्यावर ओम महाबली असे लिहिले आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीच्या पाठीमागे दुचाकी (एमएच २० इएन २५०४) उभी हाेती. यावरून दुपारपर्यंत मृताची ओळख पटली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.