आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा न्यायालयाचा निर्णय:औरंगाबादमध्ये तरुणाने कापले तलवारीने 7 केक; पोलिसांनी दिले कोठडीच 'गिफ्ट'

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मागे फटाक्यांची आतिषबाजी, डोक्यार फेटा, गळ्यात मोठा हार अण खांद्यावर शाल, पांढरा कडक शर्ट व काळी पँण्ट परिधान करुन तरुणाने धारधार तलवारीने सात केक कापले. मात्र, वाढदिवसाचा असा उत्साह ओसरत नाही तोच रात्रीतून त्याला पोलिस कोठडीची वारी करण्याची वेळ आली.

शहरात सोमवारी सिटीचौक पोलिसांनी वाढदिवसाला तलवारीने केक कापून बेधडकपणे तो सोशल मिडियवावर टाकणाऱ्या निखिल आनंद सरवैये (25) याला अटक करत तलवार देखील जप्त केली. शहरात सद्या तणावपुर्ण वातावरण आहे. काही दिवसांपुर्वीच शहरात 100 च्या जवळपास प्रमाणात ऑनलाईन तलवारी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या एकुन घटनांच्या पार्श्वभुमीवर शहर पोलिस व विशेषत: सायबर पोलिस सतर्क झाले आहे. सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्टसह दहशत निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष आहे. त्यातच 20 जून रोजी सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना त्यांच्या हद्दित एक तरुण तलवारीने केक कापून त्याचा बेधडकपणे सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ उपनिरीक्षक रोहीत गांगुर्डे, मुक्तेश्वर लाड यांना कारवाईचे आदेश दिले. गांगुडे, लाड यांनी अंमलदार मुनीर पटाण, शाहीद पटेल, ओमप्रकाश बनकर देशराज मोरे, सोहेल पठाण, अभिजीत गायकवाड यांच्या मदतीने सोशल मिडियावरुन शोध घेतला असता तो जाधवमंडीतील बांबुगल्लीत राहणारा तरुण असल्याचे समोर आले. त्यांनी तत्काळ जात निखील ला ताब्यात घेतले. काही महिन्यांपुर्वी त्याने ती तलवार विकत घेतली होती. निखिलच्या कुटूंबाचा परिसरात किराणा व्यवसाय आहे. पोलिसांनी 36 इंच लांबीची धारधार तलवार देखील जप्त करत त्याला न्यायालयात हजर केले. मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केलेल्या निखिल ला मात्र तलवारीचे हौस मुळे दुसऱ्या दिवशी पोलिस कोठडीत काढावी लागली.