आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मिक मृत्यू:पाणी शेंदताना फिट आल्याने विहिरीत पडून वैजापूर तालुक्यात तरुणाचा मृत्यू

शिऊर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथे एका तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. भरत राजाराम पवार (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. भरत हे शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी गेले हाेते. दरम्यान, फवारणीच्या पंपमध्ये पाणी भरण्यासाठी ते विहिरीतून पाणी शेंदत होते. त्याच वेळी त्यांना फिट आले आणि ते विहिरीत पडले. बुडून त्यांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ भरत यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शिऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...