आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:बैलाला अंघोळ घालताना बुडून तरुणाचा झाला मृत्यू

खुलताबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोळ्याच्या दिवशी बैलांना अंंघोळ घालताना खुलताबाद तालुक्यातील बोडखा येथील तरुणाचा माती नालाबांधातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश गायकवाड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बोडखा येथील गणेश बाबुराव गायकवाड (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश गायकवाड हे शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बैलांना आंघोळ घालण्यासाठी बोडखा शिवारातील गट नंबर ३७३ मध्ये असलेल्या माती नालाबांध पाण्यात घेऊन गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. गावातील काही तरूण माती नालाबांध जवळून जात असताना त्यांना गणेशचे कपडे पाण्याबाहेर पडलेले दिसले. ग्रामस्थांना याची माहिती देण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष अरफात शहा, पोलिस पाटील रायभान सोनवणे, माजी सरपंच सलीम पटेल यांच्यासह इतर तरूणांनी माती नालाबांध गाठले व तरुणांनी गणेशचा शोध सुरू केला. काही वेळा नंतर पोहणाऱ्या तरुणांनी गणेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. गणेशला दोन मुले व एक मुलगी आई असून दोन भाऊ आहेत.

बातम्या आणखी आहेत...