आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी मृत्यु:रंग खेळून विहिरीत पोहताना साताऱ्यातील तरुण बुडाला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

होळी खेळण्यासाठी शेतात गेलेल्या २६ वर्षीय प्रदीप पांडुरंग खरात याचा पोहताना विहिरीत बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. प्रदीपला फिटचा त्रास होता. त्यातून त्याचा तोल जाऊन तो बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मूळ तिसगाव परिसरात प्रदीप आई, वडील व भावासोबत राहत होता. त्याचे एक काका साताऱ्यातील घुगे यांच्या मळ्यात निगराणीचे काम करतात. शुक्रवारी सकाळपासून प्रदीप मित्रांसोबत रंग खेळला. त्यानंतर काही मित्रांसोबत तो घुगे यांच्या शेततळ्यात गेला. तिथे काका व इतरांसोबत होळी साजरी करून त्यांनी विहिरीत पाेहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु, विहिरीत उतरल्यानंतर पाणी खेळण्याच्या नादात प्रदीप पाण्यात खोल गेला. मात्र, बराच वेळ होऊनदेखील तो वर आला नाही. घाबरलेल्या मित्रांनी खोल जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.

प्रदीपच्या काकांना ही बाब समजताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. बराच वेळ शोधमोहीम घेतल्यानंतर प्रदीपचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पृथ्वीराज चव्हाण व गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदीपला फिटचा त्रास होता, अशी माहिती कुटुंबाने दिली. विहिरीत त्याला त्याचा झटका येऊन तोल गेल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...