आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणारा आरोपी ऋषिकेश संतोष पालोदकर (रा. पुंडलिकनगर) याच्या पोलीस कोठडीत १३ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. भंडे यांनी दिले. हडको एन-१२, सिध्दार्थनगरात राहणारा शुभम राजहंस सोनवणे (२१) हा ४ डिसेंबरला रात्री विजयनगर येथे राहणारा कुणाल पहाडे याच्या वाढदिवसासाठी गेला होता. साडेनऊ वाजता आरोपी ऋषिकेश पालोदकर, कुणाल पहाडे व त्याचे काही साथीदार कार्यक्रमात तलवार घेऊन नाचून धिंगाणा घालत होते.
त्या वेळी शुभमने ऋषिकेशला असे करणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यावर चिडलेल्या पालोदकर व त्याच्या साथीदारांनी शुभमला शिवीगाळ करत त्याच्यावर तलवारीने वार केले. त्यात शुभम गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली तलवार हस्तगत करायची आहे, आरोपीच्या साथीदारांना अटक करायची आहे, त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक सरकारी वकील अशोक घुगे यांनी न्यायालयाकडे केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.