आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:सैन्य दलात निवड झालेल्या तरुणाचा बस-दुचाकीतील अपघातात मृत्यू; लॉकडाऊन संपताच सैन्य सेवेत दाखल होणार होता

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणाची मागील भरतीत निवड झाली असून त्याला प्रशिक्षणासाठी बोलावणे आले होते

औरंगाबाद -सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावर खामगाव फाट्यावर बस आणि दुचाकी अपघातात सैन्यदलात निवड झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. औरंगाबादहून सिल्लोडकडे जाणाऱ्या बसची या तरुणाच्या दुचाकीला धडक बसली. परसराम पंढरिनाथ चिकटे (वय १९, रा.नांजा, ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

औरंगाबाद - सिल्लोड रोडवर जळगावकडे जाणारी औरंगाबाद डेपोची बस (क्र. एम एच २० बील एल ३९६३) २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास जळगावला जाण्यासाठी फर्शी फाटा पास होऊन खामगाव फाट्याजवळ आली होती. याच वेळी नांजा (ता. भोकरदन) येथील तरुण परसराम चिकटे हा दुचाकीने चौका गावाकडे बहिणीला भेटण्यासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी आणि बसची समोरासमोर टक्कर झाली. यात परसराम गंभीर झाला. पो.कॉ. नामदेव इजुलकंठे, पो. कॉ. शेख इलियास (वाहन चालक), पो. कॉ. गजानन डोईफोडे, दादासाहेब काळे यांनी त्यास देवमाळी यांच्या रुग्णवाहिकेतून फुलंब्रीला हलवले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. खिशात मिळालेल्या कागदावरून नातेवाइकांशी संर्पक करण्यात आला. या तरुणाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नांजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सैन्यदलात निवड

परसराम पंढरिनाथ चिकटे (वय १९ ) हा अनेक दिवसांपासून सैन्य दलात भरती होण्याची तयारी करत होता. अखेर त्याची मागील भरतीत निवडही झाली असून त्याला प्रशिक्षणासाठी बोलावणे आले होते. त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे त्याचा जाहीर सत्कारही करण्यात आला होता. लॉकडाऊन संपताच तो सैन्य सेवेत दाखल होणार होता.